सामाजिक कार्य

सामाजिक कार्य

रक्तदान शिबीर - 2022

रक्तदान हेच जीवनदान. सर्वांना रक्तदानाचे महत्व समजायला हवे. कारण आपण दिलेल्या रक्तदानामुळे कुणाचा तरी जीव वाचू शकतो. दर वर्षी प्रमाणे याही वर्षी खोलेश्वर मल्टीस्टेट तर्फे  शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तरूणांमध्ये रक्तदानाची जागृकता निर्माण व्हावी व सामाजिक बांधिलकी जोपासत नियमित रक्तदान त्यांनी करावे यासाठी खोलेश्वर मल्टीस्टेट दर वर्षी रक्तदान  शिबिराचे आयोजन करते. 

रक्तदान शिबीर - 2021

रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान!  गरजू रुग्णांना रक्ताची टंचाई भासू नये म्हणून रक्तदान शिबीर खोलेश्वर मल्टीस्टेट कडून आयोजित केले जाते. समाजामध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजवणे, तरुण पिढीमध्ये रक्तदानाबद्दल जागृती निर्माण करणे, निरोगी व तंदुरुस्त असताना देखील जे लोक रक्तदान करत नाहीत त्यांना रक्तदानासाठी प्रेरणा देणे हा मुख्य हेतू घेऊन खोलेश्वर मल्टीस्टेट नेहमीच रक्तदान शिबिराचे आयोजन करत असते. 

श्रमदान कार्य

धारुर तालुक्यातील हिंगणी येथे जलसंधारणाचे काम जोमात सुरू होते. बक्षीस मिळो अथवा ना मिळो पण गाव पाणीदार करायचे असा ध्यास घेतलेल्या गावकऱ्यांच्या मदतीला जाऊन खोलेश्वर मल्टीस्टेटच्या कर्मचार्‍यांनी श्रमदान केले व रोख मदतही दिली.  पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी खोलेश्वर मल्टीस्टेटच्या कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला व श्रमदान केले.