ठेव तारण कर्ज
आपण भविष्यातील गरजांसाठी, स्वप्नपूर्तीसाठी किंवा कुटुंबासाठी व मुलांसाठी म्हणून बँकेत मुदत ठेव ठेवत असतो. ज्यात पैसे सुरक्षितही राहतात व ठराविक काळानंतर त्यावर परतावाही चांगला मिळतो. किंबहुना अचानक पैशांची गरज पडल्यावर तुमच्या महत्वाच्या मुदत ठेवींवरच गदा येते. पण आता काळजी करू नका, अशा अडचणीच्या काळात खोलेश्वर मल्टीस्टेट मधून ठेव तारण कर्ज घ्या, म्हणजे तुमची गरजही भागेल आणि तुमची मुदत ठेव व त्यावर मिळणारा नफाही सुरक्षित राहील.