मुदत ठेव योजना (FD)
तुम्ही दिवसरात्र मेहनत करून जो मोबदला कमावता तोच आपल्या कुटुंबाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी बचतीच्या रूपात सांभाळून ठेवता. पण ती रक्कम तशीच ठेवून फायदा नाही. म्हणून त्या बचतीच्या रक्कमेलाही कामाला लावा, ती रक्कम खोलेश्वर मल्टीस्टेट मध्ये मुदत ठेव अर्थात FD म्हणून ठेवा म्हणजे त्या बचतीवर मिळेल योग्य व्याज; जे तुमच्या आयुष्यात आनंद व समाधानाचे क्षण घेऊन येईल आणि तुमची मेहनत आणि अगणित कष्ट स्वप्नपूर्तीच्या रूपात खऱ्या अर्थाने सत्कारणी लागतील.
खोलेश्वर मल्टीस्टेटच्या मुदत ठेव योजनेमध्ये ठराविक बचतीची रक्कम एका निश्चित काळापर्यंत ठेवायची असते. ही वेळेची मुदत संपल्यानंतर तुम्हाला या बचतीवर आकर्षक परतावा मिळतो, कारण खोलेश्वर मल्टीस्टेट कायम आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी कार्यरत असते. मुदत ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या खोलेश्वर मल्टीस्टेट शाखेला भेट द्या किंवा 9504100111 या क्रमांकावर संपर्क करा.