मला वाटतं कमाई ही केवळ आर्थिक नसते, खोलेश्वर मल्टीस्टेटच्या आजवरच्या प्रवासात मी कमावली ती मायेची माणसं, त्यांचं अफाट प्रेम आणि विश्वास! ही श्रीमंती पैशांहूनही फार-फार मोठी आहे. ग्राहकांशी असणारं खोलेश्वर मल्टीस्टेटचं नातं केवळ व्यवहारापुरतं सीमित नसून, संस्थेच्या प्रत्येक सुविधेचा लाभ घेतांना ते समाधानी असल्याचीही आम्ही काळजी घेतो. कारण त्यांचं समाधान हेच आम्ही आमचं आद्य कर्तव्य मानतो!
आज मी अभिमानाने सांगू शकतो, निस्सीम सेवा प्रदान करत खोलेश्वर मल्टीस्टेटने ग्राहकांना आनंद व समृद्धी तर दिलीच, शिवाय अशक्य स्वप्नांना पूर्ण करण्याचं पाठबळही दिलं. ग्राहकांच्या आनंदातून आम्हाला निस्वार्थ सेवेचा हुरूप येतो आणि नवनवीन सुविधा घेऊन येण्याची प्रेरणाही मिळते. तुमची अशीच अखंड साथ राहिली तर येत्या काळात संस्था ग्राहकसेवेसाठी अनेक अत्याधुनिक सेवा व सुविधा घेऊन येईल याची मी खात्री देतो. आपण देत असलेल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल समस्त खोलेश्वर मल्टीस्टेटच्या वतीने आपले कोटी-कोटी आभार.
श्री. दिलीप मुरलीधर पारेकर
अध्यक्ष – खोलेश्वर उद्योग समूह