बचत खाते
बचत म्हणजे जीवनाचा आधार आणि कुठल्याही वयात आपल्या व आपल्या परिजनांच्या उज्ज्वल भविष्यासाठी बचतीचा आदर्श मार्ग म्हणजे बचत खाते! तुम्हीही उत्तम बचत व त्यावर अधिकाधिक व्याज मिळवण्यासाठी निवडा खोलेश्वर मल्टीस्टेटचे बचत खाते. कारण तुमच्या कष्टाच्या बचतीचं महत्व जाणतो आम्ही, तुमची बचत जपतो आम्ही!
चालू खाते
व्यवसाय म्हटलं की व्यवहार चोख हवा आणि चोख व्यवहारासाठी हवे चालू खाते! तुमच्या व्यवसायाच्या उत्तुंग प्रगतीसाठी आणि आवश्यक त्या आर्थिक गरजा वेळीच पूर्ण करण्यासाठी निवडा खोलेश्वर मल्टीस्टेटचे चालू खाते! कारण तुमच्या व्यवसायाचं उज्ज्वल भवितव्य आणि उन्नतीसाठी आम्ही देऊ उत्तमोत्तम सेवा व सहयोग.
दैनंदिन ठेव (पिग्मी खाते)
आपली व आपल्या प्रियजनांची मोठंमोठी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी एक छोटीशी तडजोड पुरेशी असते, जसे की पिग्मी खाते! दैनंदिन उत्पन्नातून अगदी छोटीशी रक्कम रोज थोडी-थोडी जमा करून ठराविक कालावधीनंतर तुम्हाला छोटी-मोठी स्वप्नं, गरजा पूर्ण करण्यासाठी अथवा आकस्मिक संकट काळासाठी हातभार लावते. म्हणूनच सहज आणि सुलभ पद्धतीने बचत करून, आपल्या गरजा व स्वप्नं पूर्ण करण्यासाठी निवडा खोलेश्वर मल्टीस्टेट यांची दैनंदिन ठेव योजना ज्यात तुम्हाला मिळेल जास्तीत जास्त व्याज!