संस्थेविषयी
संस्थेविषयी
खोलेश्वर मल्टीस्टेट, नातं विश्वासाचं!
प्रवास किती लांबचा आहे यापेक्षा तो कसा आहे हे जास्त महत्वाचं असतं! सामान्य नागरिकांच्या हितासाठी, त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी म्हणून 20 मे 2012 रोजी खोलेश्वर मल्टीस्टेटचा बँकिंग क्षेत्रातील प्रवास सुरू झाला आणि पाहतापाहता 6 शाखा निर्माण होऊन 9 वर्ष कधी उलटून गेली कळलंही नाही. या प्रवासात संस्थेने असंख्य माणसं कमावली, अगणित नाती जोडली, त्यांना आपुलकीने सांभाळलं व आजवर जपलं आणि आम्ही खात्री देतो की यापुढेही असंच आपुलकीने जपत राहू. कारण संस्थेचं ब्रिदवाक्यच आहे – ‘नातं विश्वासाचं!’
विकास हा प्रत्येकाचा हक्क आहे व त्यासाठी खोलेश्वर मल्टीस्टेट कायम आपल्या ग्राहकांना पाठिंबा देते. बचत व चालू खात्यांसह आधुनिक काळाच्या आधुनिक गरजा आम्ही ग्राहकांसाठी घेऊन आलो जसे की मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, पेपरलेस बँकिंग, आधार बँकिंग, लॉकर सुविधा, कोअर बँकिंग सुविधा, निशुल्क NEFT / RTGS / IMPS सेवा, व ATM सेवा. ग्राहक शेतकरी असो वा व्यापारी, नोकरदार असो वा व्यावसायिक प्रत्येकाच्या गरजेनुसार ठेवी व कर्जाकरिता विविध पर्याय उपलब्ध करून देत संस्था अल्प कालावधीतच ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे याचा आम्हाला अभिमान आहे.
लक्ष्य
उत्तम सेवा, पारदर्शक व्यवहार, ग्राहकांचा विश्वास आणि वेळेनुसार बँकिंग सुविधेत आधुनिक बदल करत येत्या काळात महाराष्ट्र राज्यात खोलेश्वर मल्टीस्टेट पहिल्या क्रमांकाची संस्था म्हणून ओळखली जावी हेच आमचे एकमेव लक्ष्य आहे.
ध्येय
खातेदारांचा अगणित पाठिंबा आणि विश्वास यांच्या बळावर आज खोलेश्वर मल्टीस्टेट बँकिंग क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव ठरले आहे, या पुढेही अशीच प्रेमाची असंख्य नाती जोडत 31 मार्च 2022 पर्यंत खोलेश्वर मल्टीस्टेट मध्ये 101 कोटी रुपयांचा ठेवेचा आकडा सर करण्याचे आमचे ध्येय आहे.
0
+
शाखा + 1 मुख्य कार्यालय
विस्तृत नेटवर्क
0
+
कर्मचारी
2012 पासून
0
+
दिवस
मोबाईल/इंटरनेट बँकिंग सेवा
0
+
समाधानी खातेदार