मोबाईल बँकिंग
आता काळानुसार आपल्या गरजा बदलत आहेत. या गतिशील काळात आपले व्यवहारही अधिक गतिमान व कॅशलेस झाले आहेत आणि म्हणूनच ग्राहकांच्या या अत्याधुनिक गरजा पूर्ण करण्यासाठी खोलेश्वर मल्टीस्टेट देते मोबाईल बँकिंग सुविधा ज्यामध्ये तुम्हांला Mini Statement, Balance Enquiry, Fund Transfer, Bill Payments, Mobile & DTH Recharge यांसारखे सर्व बँकिंग व्यवहार आता घरबसल्या एका क्लिकवर पूर्ण करता येतील. खोलेश्वर मल्टीस्टेटसह बदलत्या काळासोबत अपडेटेड रहा, आणि आजचं खोलेश्वर मल्टीस्टेट ॲप डाउनलोड करा.
इंटरनेट बँकिंग
इंटरनेट हा सगळ्यांच्या जीवनातला एक अविभाज्य भाग झाला आहे त्यात दैनंदिन कामात तर एक महत्वाचा घटक बनला आहे. आमचे अनेक ग्राहक नोकरदार आहेत व त्यांना छोट्या-मोठ्या कामाकरिता संस्थेत येणे शक्य होत नाही, त्यांच्या करता खोलेश्वर मल्टीस्टेटची इंटरनेट बँकिंग सुविधा महत्वाची ठरते. या द्वारे ग्राहक सर्व प्रकारची कामे घर अथवा ऑफिस मधून त्याच्या वेळेनुसार सहजपणे करू शकतो.
पेपरलेस बँकिंग
खोलेश्वर मल्टीस्टेट आपल्या ग्राहकांना अपडेट ठेवण्यासाठी एक परिपूर्ण बँकिंग सेवा पुरवते ज्यात खातेदारांना मोबाईल बँकिंग सुविधा, AEPS अर्थात आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम व SMS बँकिंग, NEFT / RTGS / IMPS सुविधा, चेक कलेक्शन सुविधा, कोअर बँकिंग सुविधा आणि डिमांड ड्राफ्ट सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या आहेत. ज्याद्वारे खातेदारांचे दैनंदिन व्यवहार जलद व सुरक्षितरित्या पूर्ण होतात.
आधार बँकिंग
आज आपल्या प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे आणि तुम्हाला ठाऊकच असेल आता आपल्या आधार कार्डच्या मदतीने बँकिंग व्यवहार करणं शक्य आहे. शिवाय प्रत्येकाला ठाऊक आहे आधार बँकिंग ही सर्वात सोपी व सुरक्षित अशी आधार संलग्न पेमेंट सुविधा आहे. मग आता पैसे जमा करणे, काढणे, लाईट बिल, फोन बिल भरणे झाले सोपे!
लॉकर सुविधा
कोअर बँकिंग सुविधा
संस्थेची प्रगती हि संस्था पुरवीत असलेल्या ग्राहकाभिमुख सेवा-सुविधांवर अवलंबून असते. खातेदारांचे दैनंदिन व्यवहार जलद व सुरक्षितरित्या पूर्ण करण्यासाठी खोलेश्वर मल्टीस्टेटने ग्राहकांना कोअर बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये बँकिंग व्यवहार करण्यासाठी खातेदारांना आपल्या स्वतःच्या शाखेत जाण्याची गरज नाही. ते कुठल्याही शाखेतून ते आर्थिक व्यवहार सुलभपणे करू शकतात.
निशुल्क NEFT / RTGS / IMPS सेवा
ATM POS Machine सेवा
पूर्वी पैसे काढायचे म्हटलं की तासंतास वेळ लागायचा पण आता ती वेळच येत नाही. प्रत्येक छोट्या मोठ्या शहरात असंख्य ATM आहेत शिवाय छोट्या गावांमध्ये देखील ATM द्वारे पैसा मिळवण्यासाठी सेवा केंद्र उपलब्ध आहे. काळाच्या या बदलत्या शर्यतीत खोलेश्वर मल्टीस्टेट आपल्या ग्राहकांना अद्ययावत सेवा देतात. आता त्वरित आणि कमीत कमी वेळेत कधीही आपल्या खात्यातून पैसे काढा आणि खोलेश्वर मल्टीस्टेटच्या ATM सुविधेचा लाभ घ्या!