रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान! गरजू रुग्णांना रक्ताची टंचाई भासू नये म्हणून रक्तदान शिबीर खोलेश्वर मल्टीस्टेट कडून आयोजित केले जाते. समाजामध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजवणे, तरुण पिढीमध्ये रक्तदानाबद्दल जागृती निर्माण करणे, निरोगी व तंदुरुस्त असताना देखील जे लोक रक्तदान करत नाहीत त्यांना रक्तदानासाठी प्रेरणा देणे हा मुख्य हेतू घेऊन खोलेश्वर मल्टीस्टेट नेहमीच रक्तदान शिबिराचे आयोजन करत असते.