शुभमंगल ठेव योजना
लग्न असो वा शुभकार्य, घरातील कर्त्या व्यक्तीवर याची एक फार मोठी जबाबदारीच असते. ती जबाबदारी कुठल्याही विघ्नाशिवाय पार पडावी यासाठी तो आयुष्यभर जीवाचं रान करत असतो. पण आता अशा मंगल कार्याची चिंता सोडा, कारण खोलेश्वर मल्टीस्टेट सादर करीत आहे शुभमंगल ठेव योजना! या योजने अंतर्गत आपल्या घरातील शुभकार्याच्या आर्थिक तरतूदीची आजपासूनच तयारी करता येईल आणि ठराविक कालावधीनंतर मंगलमय सोहळा आनंदाने पार पाडता येईल.
खोलेश्वर मल्टीस्टेटच्या शुभमंगल ठेव योजनेमध्ये 15 वर्षांच्या कालावधीसाठी ठराविक रकमेची गुंतवणूक करा आणि कालावधी पूर्ण झाल्यानंतर आकर्षक परताव्यासह शुभकार्य आनंदात संपन्न करा. शुभमंगल ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या खोलेश्वर मल्टीस्टेट शाखेला भेट द्या किंवा 9504100111 या क्रमांकावर संपर्क करा.