कर्ज योजना

  • होम
  • पृष्ठ
  • कर्ज योजना
image
खोलेश्वर मल्टीस्टेट

पीक कर्ज

हे जग ज्या बळीराजाच्या मेहनतीवर आणि कष्टाच्या पिकावर आयुष्याचा आनंद घेत आहे त्याच शेतकऱ्यांवर कायम संकटांचा पाऊस पडत असतो, कधी निसर्ग साथ देत नाही तर कधी हमीभाव मिळत नाही. हे आधुनिक जग फार पुढे निघून गेलं पण शेतकरी मात्र मागेच राहीला आहे. अशात त्यांना आर्थिक अडचणींमध्ये हातभार लावण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हरितक्रांती घडवण्यासाठी खोलेश्वर मल्टीस्टेट देत आहे बळीराजाची साथ. आपली संस्था गरजू शेतकऱ्यांना देते पीक कर्ज अत्यंत मुबलक दरात व अत्यंत कमी वेळात! कारण आमचं स्वप्न आहे शेती समृद्ध देशाचं!

खोलेश्वर मल्टीस्टेट

ठेव तारण कर्ज

आपण भविष्यातील गरजांसाठी, स्वप्नपूर्तीसाठी किंवा कुटुंबासाठी व मुलांसाठी म्हणून बँकेत मुदत ठेव ठेवत असतो. ज्यात पैसे सुरक्षितही राहतात व ठराविक काळानंतर त्यावर परतावाही चांगला मिळतो. किंबहुना अचानक पैशांची गरज पडल्यावर तुमच्या महत्वाच्या मुदत ठेवींवरच गदा येते. पण आता काळजी करू नका, अशा अडचणीच्या काळात खोलेश्वर मल्टीस्टेट मधून ठेव तारण कर्ज घ्या, म्हणजे तुमची गरजही भागेल आणि तुमची मुदत ठेव व त्यावर मिळणारा नफाही सुरक्षित राहील.

खोलेश्वर मल्टीस्टेट

पिग्मी कर्ज

माणूस हा अनुभवातून शिकत असतो. म्हणून तर आपली वडीलधारी माणसं कायम सांगतात की 'सोन्यात गुंतवणूक म्हणजे उत्तम गुंतवणूक!' कारण त्यांना ठाऊक असतं की वेळ सांगून येत नाही. आपत्कालीन संकंटांसाठी कायम तयार राहायलाच हवं. मात्र अनेकदा सोनं विकताही येत नाही, कारण त्यांच्याशी आपल्या भावना व असंख्य आठवणी जोडलेल्या असतात आणि म्हणूनच खोलेश्वर मल्टीस्टेट तुम्हाला देते सोने तारण कर्ज. आम्ही सांभाळून ठेवतो तुमच्या अमूल्य दागिन्यांना आणि कमीत कमी वेळात देतो जास्तीत जास्त कर्ज.

खोलेश्वर मल्टीस्टेट

सोने तारण कर्ज

माणूस हा अनुभवातून शिकत असतो. म्हणून तर आपली वडीलधारी माणसं कायम सांगतात की 'सोन्यात गुंतवणूक म्हणजे उत्तम गुंतवणूक!' कारण त्यांना ठाऊक असतं की वेळ सांगून येत नाही. आपत्कालीन संकंटांसाठी कायम तयार राहायलाच हवं. मात्र अनेकदा सोनं विकताही येत नाही, कारण त्यांच्याशी आपल्या भावना व असंख्य आठवणी जोडलेल्या असतात आणि म्हणूनच खोलेश्वर मल्टीस्टेट तुम्हाला देते सोने तारण कर्ज. आम्ही सांभाळून ठेवतो तुमच्या अमूल्य दागिन्यांना आणि कमीत कमी वेळात देतो जास्तीत जास्त कर्ज.

खोलेश्वर मल्टीस्टेट

आवर्त ठेव कर्ज

महिन्याला पगार आला की खर्चून जातो मग बचतीला पर्याय म्हणजे आवर्त ठेव. ही ठेव तुमचे अनेक छोटे मोठे स्वप्न पूर्ण करू शकते, उत्तम परतावा देऊ शकते, शिवाय अडचणीच्या काळात तुम्हाला लोनही मिळवून देऊ शकते. होय हे शक्य आहे आपल्या खोलेश्वर मल्टीस्टेट मध्ये; जिथे तुमच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी मिळेल आवर्त ठेव कर्ज, त्वरित, तात्काळ अगदी कमी कागदोपत्रात, कारण आम्ही जाणतो तुमच्या बचतीचं महत्व, आणि म्हणूनच ग्राहकांना देतो उत्तोमोत्तम सेवा!

खोलेश्वर मल्टीस्टेट

गृह कर्ज

प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचं सर्वात मोठं स्वप्नं म्हणजे त्याचं स्वतःचं घर, पण या स्वप्नाआड येणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे भांडवल. या अडचणीवर मात करण्यासाठी खोलेश्वर मल्टीस्टेट आहे तुमच्या सोबत, आता तुमच्या गृहस्वप्नपूर्तीच्या आड कुणीही येणार नाही. तुमच्या हक्काच्या घरासाठी घ्या गृहकर्ज आणि घरभाडे देण्याऐवजी स्वतःच्या घराचा EMI भरा. आम्ही जाणतो तुमच्या इच्छांना, आम्ही देतो पंख तुमच्या स्वप्नांना!

खोलेश्वर मल्टीस्टेट

टर्म लोन

व्यवसायात प्रगती करण्यासाठी गुंतवणूक महत्वाची असते. शिवाय आर्थिक अडचणी अचानक ओढवतात, अशात व्यवसायाला गती मिळवून देण्याची संधी हातची निघून जाऊ नये म्हणून खोलेश्वर मल्टीस्टेट तुम्हाला देते टर्म लोन सेवा आणि पिग्मी टर्म लोन सेवा. या सेवांअंतर्गत ठराविक काळाकरिता तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी एका दिवसाच्या आत, १ लाखांपर्यंचे लोन घेऊ शकता. आता तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीत अडथळे येणार नाहीत, कारण खोलेश्वर मल्टीस्टेट तुमच्या पाठीशी आहे.

खोलेश्वर मल्टीस्टेट

पगार तारण कर्ज

व्यवसायात कमीजास्त का होईना पण रोज पैशांचा व्यवहार अखंड चालू राहतो, नोकरदार व्यक्तीचं तसं नाही. नोकरी म्हटलं की पगाराची महिनाभर वाट पाहावीच लागते, पण आर्थिक अडचणी तर पगाराची तारीख पाहून येत नाहीत. आता अशा बिकट परिस्थितीत तुमचा येणारा पगारच तुम्हाला मदत करेल, कारण खोलेश्वर मल्टीस्टेट मध्ये तुम्हाला मिळेल पगार तारण कर्ज. मग आता कुठलीही अडचण असो अथवा स्वप्नपूर्तीची घाई, खोलेश्वर मल्टीस्टेटला भेट द्या आणि कमी कागदोपत्रात त्वरित तात्काळ पगार तारण कर्ज मिळवा.

खोलेश्वर मल्टीस्टेट

कॅश क्रेडीट कर्ज

आपल्या आयुष्यातील काही गरजा पूर्ण करतांना नक्की किती भांडवल लागेल याची कल्पनाच नसते. अशात कर्ज घेणं अवघडच. पण चिंता करू नका, खोलेश्वर मल्टीस्टेट मधून कॅश क्रेडिट लोन घ्या. या सेवेत तुम्हाला ठराविक रक्कम क्रेडिट म्हणून दिली जाते. महत्वाचं म्हणजे तुम्ही यातून जितके पैसे काढता तितक्याच पैशांवर तुम्हाला व्याज आकारण्यात येईल, शिवाय त्याच्य दिवशी रक्कम काढून त्याच दिवशी खात्यात जमा केल्यास कुठलेही व्याज आकारण्यात येणार नाही. मग आता चिंता सोडा आणि घ्या कॅश क्रेडिट लोन!

खोलेश्वर मल्टीस्टेट

वाहन कर्ज

दैनंदिन जीवनातील कामं सोपी आणि सुलभ होण्यासाठी वाहन हवंच. त्यात व्यावसायिकांना तर हमखास वाहनाची गरज पडतेच. वर्षाकाठी त्यासाठी कित्येक पैसे खर्च होतात. पण आता तुमची ही गरज पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे खोलेश्वर मल्टीस्टेट. वाहन हे तुमचं स्वप्न असो अथवा दैनंदिन जीवनाची गरज, चिंता सोडा आणि भेट द्या खोलेश्वर मल्टीस्टेटला आणि सुलभ हफ्त्यावर खरेदी करा तुमच्या आवडीचं वाहन, ते ही अगदी सहज व कमी वेळात.

खोलेश्वर मल्टीस्टेट

होम अप्लायन्सेस कर्ज

संसार असो वा व्यवसाय, दैनंदिन जीवन सुलभ करायचं म्हणजे असंख्य गरजा आल्याच आणि जिथे गरजा तिथे खर्च तर होणारच. अशात अनेकदा आपण कॉम्प्रमाईज करतो. पण आता नो मोअर कॉम्प्रमाईज, खर्चाची चिंता सोडा आणि तुम्हाला हवे ते होम अप्लायन्सेस खरेदी करा खोलेश्वर मल्टीस्टेटच्या होम अप्लायन्सेस लोनसह... घरातील आणि व्यवसायातील कामे करा झटपट आणि सोपी, पैशांची परतफेड करा सुलभ हफ्त्यावर.

खोलेश्वर मल्टीस्टेट

मॉरगेज कर्ज

आयुष्याचे सर्व दिवस सारखे नसतात, जीवन म्हटलं की सुख-दुःख आलंच. अनेकदा अडचणीचं कारण असतं पैशांचं. ही गरज कधी लहान असते तर कधी अपेक्षेपेक्षाही मोठी. या मोठ्या अडचणीच्या काळात कष्टाने कमावलेली संपत्ती विकणे हा काही पर्याय नाही. तुमच्या सर्व लहान मोठ्या अडचणींमध्ये तुमच्या आर्थिक मदतीसाठी तुमच्या पाठीशी आहे तुमच्या हक्काची बँक खोलेश्वर मल्टीस्टेट. अशा काळात संस्थेतून घ्या मॉरगेज लोन आणि तुमच्या अडचणींवर करा मात.

खोलेश्वर मल्टीस्टेट

तत्काळ कर्ज

वेळ बदलतीये आणि वेळेनुसार आपल्या गरजाही बदलताय. या धावपळीच्या काळात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ. प्रत्येक क्षेत्रांत प्रत्येक गोष्ट वेळेत झाली तरच ती योग्य बदल आणू शकते. खोलेश्वर मल्टीस्टेट तुमच्या वेळेचं महत्व जाणते. आयुष्यात आर्थिक अडचणी सांगून येत नाहीत, अशा परिस्थितीत त्या अडचणी वेळेत सोडवण्यासाठी आम्ही देतो तात्काळ लोन सेवा, या सेवेअंतर्गत तुम्हाला मिळेल एका तासाच्या आत लोन. तुमच्या हितार्थ कायम तत्पर, खोलेश्वर मल्टीस्टेट !