ठेव योजना

  • होम
  • पृष्ठ
  • ठेव योजना
image
खोलेश्वर मल्टीस्टेट

मुदत ठेव योजना

तुम्ही दिवसरात्र मेहनत करून जो मोबदला कमावता तोच आपल्या कुटुंबाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी बचतीच्या रूपात सांभाळून ठेवता. पण ती रक्कम तशीच ठेवून फायदा नाही. म्हणून त्या बचतीच्या रकमेलाही कामाला लावा, ती रक्कम खोलेश्वर मल्टीस्टेटमध्ये मुदत ठेव अर्थात FD म्हणून ठेवा म्हणजे त्या बचतीवर मिळेल योग्य व्याज; जे तुमच्या आयुष्यात आनंद व समाधानाचे क्षण घेऊन येईल आणि तुमची मेहनत आणि अगणित कष्ट स्वप्नपूर्तीच्या रूपात खऱ्या अर्थाने सत्कारणी लागतील.

खोलेश्वर मल्टीस्टेटच्या मुदत ठेव योजनेमध्ये ठराविक बचतीची रक्कम एका निश्चित काळापर्यंत ठेवायची असते. ही वेळेची मुदत संपल्यानंतर तुम्हाला या बचतीवर आकर्षक परतावा मिळतो, कारण खोलेश्वर मल्टीस्टेट कायम आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी कार्यरत असते. मुदत ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या खोलेश्वर मल्टीस्टेट शाखेला भेट द्या किंवा +91 9130303131 या क्रमांकावर संपर्क करा.

खोलेश्वर मल्टीस्टेट

दाम दुप्पट ठेव योजना

आपली बचतच आपल्याला उत्तम फायदा मिळवून देऊ शकते. मात्र त्यासाठी हवं एक विश्वासार्ह ठिकाण, जशी की आपली खोलेश्वर मल्टीस्टेट; जिथे आमचे असंख्य ग्राहक व लाभार्थी साक्षिदार आहेत आमच्या निस्वार्थ सेवा आणि विश्वासार्हतेचे. म्हणूनच एक अविश्वसनीय परतावा मिळवण्यासाठी निवडा खोलेश्वर दाम दुप्पट ठेव योजना आणि ठराविक मुदतीनंतर आपल्या बचतीवर मिळवा दुप्पट फायदा!

तुमच्या गुंतवणुकीची रक्कम दुप्पट करून मिळवण्यासाठी या प्रकारच्या ठेव योजना अंमलात आणल्या जातात, हे तुमच्या लक्षात आलंच असेल, पण खोलेश्वर दाम दुप्पट ठेव योजनेत केवळ ठेवीवर दुप्पट परतावा मिळत नाही तर जोडीला मिळते हमखास फायदा व सुरक्षिततेची हमी. आमच्या दाम दुप्पट ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या खोलेश्वर मल्टीस्टेट शाखेला भेट द्या किंवा +91 9130303131 या क्रमांकावर संपर्क करा.

खोलेश्वर मल्टीस्टेट

मासिक ठेव योजना

ग्राहकांच्या आर्थिक नफ्यासाठी कायमच खोलेश्वर मल्टीस्टेट तत्परतेने उत्तमोत्तम सेवा घेऊन येत असते, त्यातलीच एक म्हणजे मासिक ठेव योजना! अगदी कमी कालावधीत उत्तम परतावा मिळवण्यासाठी एक सवोत्तम पर्याय. मासिक ठेव योजना ही केवळ योजना नाही तर तुमच्या गरजा पूर्ण करण्याचं एक आर्थिक नियोजन आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या गरजा असो वा स्वप्नं, ते स्वबळावर पूर्ण करू शकता. आणि जीवनात आपली स्वप्नं कुणाच्याही मदतीशिवाय पूर्ण करणं याहून मोठं सुख नाही.

खोलेश्वर मल्टीस्टेटच्या मासिक ठेव योजनेमध्ये तुमच्या बचतीची गुंतवणूक करा, ज्यात तुम्हाला दर महिन्याला या बचतीवर मिळेल आकर्षक परतावा. खोलेश्वर मल्टीस्टेट कायम आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त फायदा देण्यासाठी कार्यरत असते. आमच्या मासिक ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या खोलेश्वर मल्टीस्टेट शाखेला भेट द्या किंवा +91 9130303131 या क्रमांकावर संपर्क करा.

खोलेश्वर मल्टीस्टेट

दाम दीडपट ठेव योजना

पैशांची गुंतवणूक करणं सोपं नसतं. मार्केटचा अभ्यास हवा, उत्तम मोबदला आणि महत्वाचं म्हणजे खात्रीशीर फायद्याची हमी असेल तरंच योग्य गुंतवणूक केली जाते. पण तुम्ही काळजी करू नका, खोलेश्वर मल्टीस्टेट यांच्या दाम दीडपट ठेव योजनेअंतर्गत तुमच्या गुंतवणुकीवर ठराविक कालावधीनंतर हमखास दीडपट नफा मिळवा, जोडीला वर्षानुवर्षांच्या विश्वासाची हमी आहेच!

तुमच्या गुंतवणुकीची रक्कम दीडपट करून मिळवण्यासाठी या प्रकारच्या ठेव योजना अंमलात आणल्या जातात हे तुमच्या लक्षात आलंच असेल, पण खोलेश्वर मल्टीस्टेटच्या दाम दीडपट ठेव योजनेत केवळ ठेवीवर दीडपट परतावा मिळत नाही तर जोडीला मिळते हमखास फायदा व सुरक्षिततेची हमी. आमच्या दाम दीडपट ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या खोलेश्वर मल्टीस्टेट शाखेला भेट द्या किंवा +91 9130303131 या क्रमांकावर संपर्क करा.

खोलेश्वर मल्टीस्टेट

शुभमंगल ठेव योजना

लग्न असो वा शुभकार्य, घरातील कर्त्या व्यक्तीवर याची एक फार मोठी जबाबदारीच असते. ती जबाबदारी कुठल्याही विघ्नाशिवाय पार पडावी यासाठी तो आयुष्यभर जीवाचं रान करत असतो. पण आता अशा मंगल कार्याची चिंता सोडा, कारण खोलेश्वर मल्टीस्टेट सादर करीत आहे शुभमंगल ठेव योजना! या योजने अंतर्गत आपल्या घरातील शुभकार्याच्या आर्थिक तरतूदीची आजपासूनच तयारी करता येईल आणि ठराविक कालावधीनंतर आनंदी क्षणाचा मंगलमय सोहळा विनासायास पार पाडता येईल.

खोलेश्वर मल्टीस्टेटच्या शुभमंगल ठेव योजनेमध्ये १५ वर्षांच्या कालावधीसाठी ठराविक रकमेची गुंतवणूक करा आणि कालावधी पूर्ण झाल्यानंतर आकर्षक परताव्यासह शुभकार्य आनंदात सकळसंपन्न करा. शुभमंगल ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या खोलेश्वर मल्टीस्टेट शाखेला भेट द्या किंवा +91 9130303131 या क्रमांकावर संपर्क करा.

खोलेश्वर मल्टीस्टेट

दशकपूर्ती ठेव योजना

पैशांच्या योग्य गुंतवणुकीतून उत्तम मोबदला कमावण्यासाठी, छोट्या छोट्या निणर्यांतून मोठमोठी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या प्रियजनांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजपासूनच तरतुद करायला हवी. म्हणूनच निवडा खोलेश्वर मल्टीस्टेट यांची दशकपूर्ती ठेव योजना. या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर १० वर्षात हमखास चार पट नफा कमवाल. आणि अत्यंत सुरक्षित पद्धतीने आपल्या आयुष्यातील सर्व स्वप्नं पूर्ण करु शकाल.

खोलेश्वर मल्टीस्टेटच्या दशकपूर्ती ठेव योजनेचा आजवर असंख्य ग्राहकांनी लाभ घेऊन आपली स्वप्नं पूर्ण केली. तुम्हीही आजच निर्णय घ्या, तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा आणि स्वप्नपूर्तीसाठी आमच्या दशकपूर्ती ठेव योजनेचा लाभ घ्या. दशकपूर्ती ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या खोलेश्वर मल्टीस्टेट शाखेला भेट द्या किंवा +91 9130303131 या क्रमांकावर संपर्क करा.

खोलेश्वर मल्टीस्टेट

आवर्त ठेव (आर.डी.)

व्यावसायिक असो किंवा नोकरदार, महिन्याकाठी येणारे पैसे बऱ्याचदा दैनंदिन गरजा पूर्ण करण्यातच संपून जातात. अशा वेळी बचत करायची तरी कशी असा विचार करत असाल तर आजच एक उत्तम निणर्य घ्या, खोलेश्वर मल्टीस्टेट मध्ये आवर्त ठेव सुरू करा. या सेवेमध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवल्यास कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मुद्दला सह आकर्षक व्याजही कमावता येईल.

खोलेश्वर मल्टीस्टेटच्या आर.डी. अर्थात आवर्त ठेव योजनेमध्ये ठराविक बचतीची रक्कम एका निश्चित काळापर्यंत ठेवायची असते. ही वेळेची मुदत संपल्यानंतर तुम्हाला या बचतीवर आकर्षक परतावा मिळतो. कारण खोलेश्वर मल्टीस्टेट कायम आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी कार्यरत असते. आमच्या आवर्त ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या खोलेश्वर मल्टीस्टेट शाखेला भेट द्या किंवा +91 9130303131 या क्रमांकावर संपर्क करा.

आवर्त ठेव (आर.डी.) कालावधी (महिने)
आर.डी. ० - १२
१३ - २४
२५ - ३६
३७ - ७०
७१ - ७५