प्रवास किती लांबचा आहे यापेक्षा तो कसा आहे हे जास्त महत्वाचं असतं! सामान्य नागरिकांच्या हितासाठी, त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी म्हणून २० मे २०१२ रोजी खोलेश्वर मल्टीस्टेटचा बँकिंग क्षेत्रातील प्रवास सुरू झाला आणि पाहतापाहता ७ शाखा निर्माण होऊन ९ वर्ष कधी उलटून गेली कळलंही नाही. या प्रवासात संस्थेने असंख्य माणसं कमावली, अगणित नाती जोडली, त्यांना आपुलकीने सांभाळलं व आजवर जपलं आणि आम्ही खात्री देतो की यापुढेही असंच आपुलकीने जपत राहू. कारण संस्थेचं ब्रिदवाक्यच आहे - 'नातं विश्वासाचं!'
विकास हा प्रत्येकाचा हक्क आहे व त्यासाठी खोलेश्वर मल्टीस्टेट कायम आपल्या ग्राहकांना पाठिंबा देते. बचत व चालू खात्यांसह आधुनिक काळाच्या आधुनिक गरजा आम्ही ग्राहकांसाठी घेऊन आलो जसे की आर टी जी एस /एन ई एफ टी /आय एम पी एस सेवा, मोबाईल बँकिंग, एस एम एस बँकिंग, पिग्मी सेवा, कोर बँकिंग, डिमांड ड्राफ्ट, लॉकर व ए टी एम सेवा. ग्राहक शेतकरी असो वा व्यापारी, नोकरदार असो व व्यावसायिक प्रत्येकाच्या गरजेनुसार ठेवी व कर्जाकरिता विविध पर्याय उपलब्ध करून देत संस्था अल्प कालावधीतच ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे याचा आम्हाला अभिमान आहे.